कन्हान : – महाराष्ट्र राज्यातील परभणी येथे ड़ॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोरील भारतीय राज घटनेची उद्देशिकेची विडंबना करण्यात आली. यातील दोषीला फ़ाशीची शिक्षा द्यावी, जेणे करून दोन समा जात तेढ़ निर्माण करणारी मानसिकता संपुष्टात येईल अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने महामहि म राष्ट्रपती यांना पोलीस निरिक्षक राजेन्द्र पाटील कन्हान याच्या मार्फ़त निवेदनातुन करण्यात आली.
दोन समाजात तेढ़ निर्माण करणाऱ्या विचार सरणीला आळा घालण्याचे कार्य राज्य शासनाने करा वे ज्यामुळे शांति व सुव्यवस्था बाधिता करणारे कृत्य होणार नाहीत. देशात आणि राज्यात समस्त महा पुरुषाच्या पुतळ्याना गृहमंत्रालयाकडुन विशेष सृरक्षा प्रदान करावी, जेणे अनुचित प्रकारावर आळा बसेल अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात बसपा नेते चंद्रशेखर भिमटे, रामटेक विधानसभाध्यक्ष राजेश फुलझेले, मनोज गोंडाने, नितिन मेश्राम, सुशिल डोंगरे, सुशिल कळमकर, शहर कार्याध्यक्ष संदीप शेंडे, शहराध्यक्ष शरद मेश्राम, खुशाल बंसोड़, राष्ट्रपाल पौनिकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.










