वेकोलि मुख्यालयाच खासदार बर्वे च्या अ़ध्यक्षेत बैठक संपन्न

16

कन्हान : – रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे अध्यक्षेत वेकोलि मुख्यालय नागपुर येथे वेकोलि अधिका-यांशी वेकोलि व्दारे प्रलंबित विविध समस्या मार्गी लावण्या विषयी बैठकीत चर्चा करून विविध समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देशित करण्यात आले.
मंगळवार (दि.२४) डिसेंबर ला वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड मुख्यालय नागपुर येथे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे अध्यक्षेत माजी मंत्री सुनिल केदार, उमरेड चे आमदार संजय मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थित रामटेक क्षेत्रातील अनेक समस्याच्या संबंधा ने चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी वे. को.ली नागपुर क्षेत्र व उमरेड क्षेत्राच्या नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या विषयी वे.को.ली प्रबंधनाशी सखोल चर्चा करण्यात आली. जात शेतक-यांच्या शेत जमीन अधिग्रहणाच्या बदल्यात रोजगार देण्यास विलं ब करणे, वेकोली खदान ने प्रभावित ग्राम पंचायत चे पुनर्वसन, शेतक-याच्या शेतजमींन अधिग्रहण करताना त्याना तेथेच रोजगार, नौकरी देणे, आरोग्या सम्बंधित समस्या, ठेकेदाराने श्रमिकाना योग्य वेतन व सुविधा नियमानुसार द्यावे, महिलाना स्वैच्छिक सेवानिवृत्ती देऊन वारसाना रोजगार देणे, वेकोली द्वारे खेळाचे मैदान उपलब्ध करावे, सी.एस.आर निधीतुन कोळसा खदान प्रभावित गाव परिसराचा विकास करणे असे विविध प्रलंबित समस्या वे.को.ली प्रबंधनाने तात्काळ मार्गी लावाव्यात असे निर्देशित कपण्यात आले. या प्रसंगी इंटक राष्ट्रीय सचिव मा. एस.क्यु.जमा, इंटक नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे, समाज कल्याण सभा पती जि.प.नागपुर मिलिंद सुटे, प.स.उपसभापती सुरेश लेंडे, ग्रा पं घाटरोहणा सरपंच किशोर बेहुने, गोंडे गाव सरपंचा मनिषा दलाल, कांद्री माजी सरपंच बलवं त पडोळे, ग्रा पं टेकाडी सदस्य सतीश घारड, वेकोलि प्रबंधन अध्यक्ष सह प्रबंध निदेशक जे.पी. द्विवेदी, निदे शक वित्त एवं निदेशक कर्मिक विक्रम घोष, निदेशक तांत्रिक अनिल कुमार सिंह, महाप्रबंधक औद्योगिक आर.के सिंह, नागपुर क्षेत्रिय महाप्रबंधक सुनील कुमार , उपक्षेत्रीय प्रबंधक शरद दीक्षित, आर.बी वर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.