मल्हारी बुवा काळे स्मृती दिनी २५ युवकांनी केले रक्तदान

41

कन्हान  : – अखिल भारतीय मांगगारोडी, दलित आदि वासी भटके संघर्ष समिती (महाराष्ट्र) आणि एम.जि. एस. स्पोर्टीग शिक्षण संस्था कन्हान व्दारे झेंडा चौक विष्णु लक्ष्मी नगर वाघधरे वाडी तारसा रोड कन्हान येथे मल्हारी बुवा काळे स्मृती दिनी पंचविस युवकांनी केेले रक्तदान.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावरचे गाढे अभ्यासक आणि महाराष्ट्र शासना व्दारे महात्मा जोतिबा फुले समाजधिश पुरुस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरुस्कार, लोक शाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरूस्कार प्राप्त राष्ट्रीय किर्तनकार मल्हारी बुबा काळे यांचा स्मृती दिवस सोमवार (दि.२३) डिसेंबर २०२४ ला झेंडा चौक विष्णुलक्ष्मी नगर वाघधरे वाडी तारसा रोड कन्हान येथे श्री. रघुनाथ पात्रे वरिष्ठ समजासेवक यांचे अध्यक्षे त प्रमुख अतिथी विक्रम उमे कल्का हरियाणा, बालु भाऊ भिसे गोंदिया, शाहीर मीश्रीलाल शेंडे मुडीकोटा, मा. अंबादास खंडारे माजी जि प सदस्य कन्हान, अमर हातागळे यवतमाळ, डॉ. गजभिये सर लाईफ लाईन रक्तपेटी नागपुर आदींच्या प्रमुख उपस्थित मल्हारी बुबा काळे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवांदन करून रक्तदान शिबीराची सुरूवात करण्यात आली. २५ युवकांनी रक्तदान करून मल्हारी बुवा काळे यांच्या स्मृतीस अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता नेवालाल पात्रे, भूरा पात्रे, किशोर शेंडे, विनोद पात्रे, बिरजु हातागळे, सोनु लोंढे, आर्जून पात्रे, सावन लोंढे, शक्ती पात्रे, मेहर इंचुलकर, सतिश नाडे, सागर पात्रे, मोरेश्वर खडसे आदी सह अखिल भारतीय मांगगारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती (महाराष्ट्र) आणि एम.जि.एस. स्पोर्टीग शिक्षण संस्था कन्हान च्या पदाधिकारी व सदस्यानी सहकार्य केले.