केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात,महाविकास आघाडीच्या आमदारांनी केले वॉक आऊट

26

नागपूर – संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उदगार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी वॉक आऊट केले.

सभागृहात आम्ही गृहमंत्र्यांच्या उदगारावर निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्ड वर यावे यासाठी सभापती यांनी वेगळी भूमिका घेतली. गृहमंत्री यांचे उदगार हे.

संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. महायुती त्यांचा आदर करत नाही का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो मग गृहमंत्री यांच्या उदगाराचा मुद्दा का उपस्थित केला जात नाही असा सवाल करत दानवे यांनी निषेध व्यक्त केला.