भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक, लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांची आज जाहीर सभा.

56

भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक, लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांची आज जाहीर सभा.

‘सैराट’फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची विशेष उपस्थिती
मुल (प्रती)
नगर परिषद  निवडणुक प्रचाराच्या  शेवटच्या दिवशी  दि.01 डिसेंबरला 2025  सोमवार रोजी संध्याकाळी 5 वाजता नगर परिषद  गुजरी चौक, मुल येथे भाजपाच्या उम्मेदवारांच्या प्रचारार्थ  भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर मतदारसंघाचे  आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुल येथील भव्य सभेला  ‘सैराट’फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु  हिची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे.
jahir sbha
नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ मुल येथे सायंकाळी 5 वाजता आणि बल्लारपूर येथे सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा होणार आहेत. मुल येथील गुजरी चौकात आणि बल्लारपूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ (गांधी चौक), अभिनेत्री रिंकू राजगुरु नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे.सर्व मतदारांसाठी  ही प्रेरणादायी भेट ठरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा आयोजकांनी केले आहे.
” सैराट फेम “ अभिनेत्री रिंकू राजगुरु यांचा ‘आशा’ हा चित्रपट  येत्या 9 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून यामध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे.  कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या आशा सेविकेची प्रमुख भूमिका रिंकू राजगुरु हिने साकारली आहे. रिंकूने साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला व प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक आवाज आहे. त्यादृष्टीने आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मुल आणी बल्लारपुर सभांमध्ये रिंकू राजगुरु हिची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे.