कामठी – शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. तालुक्यातील काही पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले आहे. तर काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत.
तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र कंत्रादारच्या मंनमर्जी कारोभार मुडे तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.
शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. तालुक्यातील काही पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले आहे. तर काही गावानजीकचे रस्ते ग्रामपंचायत मध्ये ठराव पास करून मंजूर करण्यात आले आहे . तालुक्यातील अजनी गावांतील भगवंतराव रडके यांच्या शेता पासून तर हरीश रावेकर यांच्या शेता पर्यंत पांदण रस्त्याचे दुरुस्ती करिता दहा लक्ष रुपय मंजूर करण्यात आले मात्र कंत्रादारा ने हार्ड मुरर्म टाकून अर्धवट काम केलं असल्याचा आरोप स्थानीय शेतकरी हरीश रावेकर यांनी केला आहे ,या पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर खताचा मोठा खड्डा आहे ,ज्या मुडे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे ,या संदर्भात संबंधित विभागाकडे अनेक दा पाठपुरावा तसेस लेखी तक्रार करून सुधा पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.अर्धवट कामाच्या मधामधून शेतकयांना वाट काढावी लागत आहे.










