बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

203

नागपुर — महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच आज रविवार दिनांक १५/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले,
त्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय विमानतळ येथे परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या संस्थापिका व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा शाॅल व तथागत गौतम बुध्दांची मुर्ती देवून स्वागत व सत्कार करण्यात आले.


या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे विदर्भ महासचिव श्री. अजयभाऊ कदम, नागपुर जिल्हा अध्यक्ष श्री. संदीप दादा कांबळे, दिपक सिरीया, विष्णु ठवरे, महेंद्र थुल, अरविंद वाळके, रवि रंगारी, विलास चंदनखेडे, नरेंद्र चव्हाण, उदास बंसोड, सुभाष सोमकुवर, दिपंकर गणविर, चंदु लांजेवार, विलास बंसोड, अशपाक कुरेशी, अंकुश बांबोर्डे, अनुभव पाटील, मनीष डोंगरे, नंदा गोडघाटे, सावला सिंगाडे, विशाखा गेडाम, रजनी गजभिए, उषा भावे, रेखा पाटील, ईत्यादी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारे सुध्दा स्वागत करण्यात आले.