अवैधरित्या रेती चोरून वाहतुक करणाऱ्या आरोपीतां विरूध्द कारवाई

42

कन्हान : – गाडेघाट ते कन्हान रोड ने कन्हान नदीतुन ट्रँक्टरने अवैधरित्या रेती चोरून वाहतुक करताना कन्हान पोलीसानी पकडुन ट्रँक्टर चालक व मालक यांचे विरूध्द कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        रविवार (दि.८) डीसेंबर २०२४ ला दुपारी २.३०  वाजता कन्हान पोलसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्री शीर माहीती मिळाली की, गोंडेगाव बिट अंतर्गत गाडे घाट ते कन्हान रोडनी ट्रक्टर मध्ये रेतीची चोरटी वाहतु क केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी गाडेघाट कडुन कन्हान कडे येणारा एक संशयित ट्रँक्टर क्र. एम.एच ४० ए २८५७ ला थांबवुन वाहनाची पाहणी केली असता ट्रँक्टर मध्ये रेती आढ ळुन आली. ट्रँक्टर चालक आरोपी गणेश शंकर बागडे वय ३४ वर्षे, रा. पिपरी कन्हान याला परवानी बाबत विचारपुस केली असता त्याने कोणताही परवाना नस ल्याबाबत सांगितले. तसेच ट्रँक्टर मालका उमेश यादव रा.पिपरी कन्हान असे असल्याचे सांगितल्याने कन्हान पोलीसांनी पंचासमक्ष ट्रँक्टर मध्ये अंदाजे अर्धा ब्रास रेती किंमत १५०० रूपये आणि ट्रँक्टर किंमत ५ लाख रूपये असा एकुण ५,०१,५०० रूपयाचा मुददेमाल जप्त केला. कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीसानी ट्रँक्टर चालक गणेश शंकर बागडे व मालक उमेश यादव यांच्या विरू ध्द पोस्टे कन्हान येथे कलम ३०३(२) भा.न्या.सं सह कलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल संहि ता सह कलम ४,२१ खाण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.