नागपूर : येत्या दोन दिवसांत काही काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र उर्वरित भागात हवामान कोरडे होऊ लागले आहे. राज्यात थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ आकाशाचा प्रश्न टळणार आहे. उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे तापमानात घट होऊन विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 9 डिसेंबरपासून हवामानात बदल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.आज, 9 डिसेंबर रोजी विदर्भात ढगाळ वातावरण राहील, धुके आणि काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे विविध ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
विदर्भात आता तापमान कमी होत आहे. नागपूर, गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान 16 अंश तर बलढाणा 18 अंश होते. तिथेच, अमरावती,अकोला,वर्धा,आणि यवतमाळ मध्ये किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असल्याचा सभवणा आहे.










