डॉ बी. आर. आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली

85

कामठी – विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला मा. ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनात माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पल, ओगावा सोसायटी, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, हरदास विद्यालय, हरदास प्राथमिक शाळा, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, दादासाहेब कुंभारे विद्यालय, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, निर्धार महीला व बाल विकास समिति, ईत्यादी संस्थेमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, धम्मसेवक धम्मसेवीका प्रामुख्याने उपस्थित होते.