रब्बी हंगामावर ढगाळ वातावरणाचा परिणाम. 

25

रब्बी हंगामावर ढगाळ वातावरणाचा परिणाम.

मुल(प्रति)
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. शेतात विविध पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु सध्या ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रब्बी पिकाला बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रब्बी हंगाम म्हणजे हिवाळ्यातील पिकांचा हंगाम, जो पावसाळ्यानंतर (ऑक्टोबर-नोव्हेंबर) सुरू होतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला (मार्च-एप्रिल) संपतो.  गहू, हरभरा, मोहरी, वाटाणे,उन्हाळी धान,मका यांसारखी पिके घेतली जातात, ज्यांना थंड हवामान व जमिनीत शिल्लक राहिलेल्या ओलाव्याची गरज असते.
खरीप पिकांनंतरचा हा दुसरा महत्त्वाचा हंगाम असून, या पिकांना वाढीसाठी थंड वातावरण अनुकूल असते.
थोडक्यात, रब्बी हंगाम म्हणजे हिवाळ्यातील शेतीचा काळ, ज्यात थंडीत पिकणारी पिके घेतली जातात.
गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने वातावरण बदलाचा थेट परिणाम खरीप पिकातील तूर आणि रब्बी हंगामातील पिकावर होणार असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
“वातावरण बदलाचा व सध्या ढगाळ वातावरण असल्याने  खरीप हंगामातील तूर पिकावर याचा परिणाम होणार आहे. तूर पीक फुलोरा अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांनी फवारणी करून  पिकाची विशेष काळजी घ्यावी.”
मनीषा राजनहिरे
कृषी अधिकारी, पंचायत समिती, मुल.