कन्हान : – विकास प्राथमिक शाळा कन्हान येथे शाळे त घेण्यात येणारे विविध सांस्कृतिक व क्रीडा महोत्स वात सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षी स वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख्याने बळी राम दखणे हायस्कुलचे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव व व्यवस्थापन कमेटी अध्यक्ष यतीनकुमार पशी ने, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, ज्येष्ठ शिक्षक शशि कांत बोंद्रे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वर्षभरात होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवु न आपल्या कला कौशल्याचे प्रदर्शन करून प्राविण्य प्राप्त करित आपल्या सर्वांगीण विकासाकरिता त्यांनी तत्परता दाखवली. अशा विद्यार्थ्यांचे गुणगौरव उपस्थि त पाहुण्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री रविकांत गेडाम, सौ कविता भगत, शरद डोकरीमारे, देवेंद्र सेंगर, अभिलाषा कावळे, ज्योती गोडे, योगिता भनारकर, घोंगडे यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.










