राम सुतार यांच्या शिल्पांमधून राष्ट्रभक्ती, भव्यतेची प्रेरणा ;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भावना

19

मुंबई दि. २० मार्च – शिल्पकार राम सुतार यांची शिल्पे ही अभूतपूर्व आहेत. या शिल्पांमधून त्यांची राष्ट्रभक्ती, इतिहासाची जाणीव आणि भव्यतेची प्रेरणा मिळते अशा भावना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

शिल्पतपस्वी, पद्मभूषण राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली, असे सांगून बावनकुळे म्हणाले की, अतिशय आनंददायी घोषणा केली. त्याचा मनपूर्वक खूप आनंद झाला.
मला व जगाला ज्यांच्या शिल्पकौशल्याने मोहित केले आहे. वयाची शतकी वाटचाल करणारे राम सुतारजींचे प्रसंगोचित निरीक्षण, अनुभवसंपन्न आशय, शिल्प निर्मितीची त्यांच्या अलौकिक कलासाधनेपुढे मी नतमस्तक आहे. महायुती सरकारचा हा निर्णय कलारसिकांना आनंद देणारा असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.