कन्हान : – पोलीस स्टेशन हद्दीतील बोरडा रोड स्थित लिला इंटरनँशनल स्कुल कांद्री येथे कन्हान पोस्टे व्दारे विद्यार्थी, पालक व शिक्षक हयाना वाहतुकी विषयी मार्गदर्शन करून शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतुक नियमा विषयी कार्यशाळा घेण्यात आली.

मंगळवार (दि.०४) जानेवारी ला पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील लिला इंटरनँशनल स्कुल बोरडा रोड कांद्री या शाळेत भेट देवुन शाळेतील शिक्षकांची व पालकांची वाहतुक संबधाने मिटींग घेण्यात आली व शाळेतील मुलांना, शिक्षकांना व पालकांना वाहतुक नियमा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवितांना परिवहन विभागा कडुन ठरवुन दिलेल्या नियमात व वाहनात मुलांना पाठविण्या संबधी सुचना देण्यात आल्या, शाळेतील मुलांची वाहतुक नियमा संबधाने कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळा ही सहायक पोलीस निरिक्षक श्री राकेश बावनकर, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार देशपांडे साहेब, पोना अनिल यादव, अतिश मानवटक र, लिला इंटरनँशनल स्कुल चे संचालक संदेश रंगारी, दिपक धुनाले, प्राचार्य स्वाती गुप्ता मँडम, हेड मास्टर हिना गेडाम मँडम, पालक शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.










