कन्हान : – ६७ वा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळा कन्हान परिसरात शासकिय शाळा, विद्यालय, सामाजिक संस्था, विविध संघटना व्दारे उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान
रविवार (दि.२६) जानेवारी २०२५ ला श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येते प्रजासत्ता क दिनी शाळेचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी वाघमारे आणि माजी मुख्याध्यापिका वंदना रामापुरे यांचा प्रमुख उप स्थितीत झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला. प्रशांत मसार, धनंजय कापसिकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. झेंडा वंदना नंतर लगेचच सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यानी सादर केले आणि सोबतच क्रिडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमा ची प्रास्तविक मुख्याध्यापक हेमंत वंजारी हयांनी केले तर आभार प्रदर्शन पवनकुमार ठमके यांनी केले. कार्य क्रमास आयेशा अन्सारी, गीता वंजारी, भास्कर सात पुते, अभिषेक मोहांकर, जयश्री पवार, किर्ती वैरागडे, नेहा गायधने, मंदाकिनी रंगारी, योगिता चांदेवर, गणेश रामापुरे, स्वर्णा रामापुरे आदी शिक्षक सह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यशवंत विद्यालय वराडा
यशवंत विद्यालय वराडा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा शाळेचे संचालक भुषणराव निंबाळकर यांचे अध्यक्षेत आणि ग्रा प वराडा सरपंच मा. सुनिल जामदार यांचे हस्ते महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबे डकर, राष्ट्रीय ध्वजाचे पुजन, पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस पाटील संजय नेवारे, ग्रा प सदस्य प्रणय गुरांदे, अमित घारड, जेष्ट नागरिक प्रभुजी चिखले, आंनदराव गुरांदे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती निंबाळकर, माजी विद्यार्थीनी आदिती जामदार, अश्वि नी राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेत (दि.१) जानेवारी पासुन आयोजित विविध स्पर्धा, कार्यक्रमाचे बक्षीष वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदंनतर विद्यार्थ्यानी सांस्कृतिक देशभक्तीपर नुत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रसाद वितर ण करून ७६ वा प्रजासत्ताक दिन थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती निंबाळकर, शिक्षिका अर्चना शिंगणे, स्वर्णा गावंडे, शिक्षक राजेंद्र गभणे, राकेश गणविर, सतिश कुथे, मोतीराम रहाटे, दीपक पांडे सह विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान
रविवार (दि.२६) जानेवारी२०२५ ला सकाळी ८ वाजता सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे ७६ वा प्रजासत्ताक दिवस कार्यक्रम साजरा कर ण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरिभाऊ पडोळे व सौ छायाताई नाईक यांचे शुभहस्ते आणि वासुदेवराव चिकटे अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय यांचे प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून राष्ट्रीय ध्वजाचे पुजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आले. राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान गायन करण्यात आले. “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या कार्य क्रमाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दिनकर राव मस्के यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी महोदयांनी प्रजासत्ताक दिनाविषयी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी
वसंतराव इंगोले, प्रकाशराव नाईक, मायाताई इंगोले, आशाताई भोमले, सुनिता येरपुडे, अल्काताई कोल्हे, गुलाबराव ढोबळे, पुरुषोत्तम कुंभलकर, योगेश बर्वे, श् मिलिंद वाघधरे, सुमित घोरपडे, मनिष उईके, कु प्रिया तांबे, किशोर चिकटे, एन के खानजोडे, आकाश गुप्ता, रवि वानखेडे, राहुल पारधी, शुभम शेंडे, प्रदीप भोंडे, शुभम कावळे, कृणाल कोल्हे इत्यादी सभासद वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनोहर कोल्हे सचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम बारई ग्रंथ पाल यांनी केले. सर्व उपस्थितांना मिठाई वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मांग-गारोडी सामाजिक संघटना कन्हान
झेंडा चौक विष्णुलक्ष्मी नगर तारसा रोड वाघधरे वाडी कन्हान येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन उत्साहाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बैजुजी भालेकर प्रमुख पाहुणे आंबादास खंदारे, रघुनाथ पात्रे, मोरेश्वर खडसे, किशोर शेंडे प्रामु ख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मांग-गारोडी सामाजि क संघटनेचे कॅलेंडर चे विमोचन करण्यात आले. या प्रसंगी सतीश नाडे, भुरा पात्रे, सावन लोंढे, सनी पात्रे, बादल लोंढे, आर्जुन पात्रे, वीर गायकवाड, किंमत पात्रे, सुमित पुरवले, भाटिया पात्रे, किरण पेटारे, चंदन गाय कवाड, सूर्या पात्रे, गोलु थवाईत, रामा पात्रे, सिद्धार्थ पात्रे, रजित खडसे, अंकित बचले, रोहित खडसे उप स्थित होते. सुत्रसंचालन नेवालाल पात्रे यानी तर आभार भुरा पात्रे यांनी मानले.

महापुरुषांना अभिवादन करुन प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
कन्हान शहर विकास मंच द्वारे २६ जानेवारी ला ७६ व्या प्रजासत्ताक दिवस गांधी चौक कन्हान येथे महापुरूषांना अभिवादन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम मंच चे नवनिर्वाचित सदस्य चेतक पोटभरे यांचे अध्यक्षेत तर प्रमुख पाहणे माजी सैनिक जयवंत गटपाडे, राजु सहारे, शेख मोहम्मद, इसराईल शेख, अरविंद अंबासकर आदी मान्यवरांचा हस्ते राष्ट्र पिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेड कर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरू वात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय तिरंगा झेंडाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, जेष्ठ नागरि क भरत सावळे, अशोक पाटील यांनी प्रजासत्ताक दिवसाचे उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . मंच सदस्यांनी आणि नागरिकांनी महापुरुषांच्या प्रति मेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करित प्रजा सत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अर्जुन पात्रे आणि आभार प्रदीप बावने यांनी मानले. याप्रसंगी मंच चे मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, नाना ऊकेकर, चिंतामण शेंडे, नितिन मेश्राम, माहेर इंचुलकर, राजकुमार पटले, राहुल सोनबरसे, मोहम्मद शकीब शेख, संजय तिवस कर, अनुराग महल्ले, अरविंद कश्यप, सुजल यादव, शुभम बावनकर, हिमांशु कोसळकर, मुकुल शिवारकर , विक्रम यादव, चेतन वैद्य, गणेश भालेकर, चिराल वैद्य , प्रशांत पाटील, समशेर पुरवले, प्रितम शेंडे, बंडुजी इडपाते, रामलाल पट्टा, विठ्ठल ऊके, वामन मेश्राम, हुकुमराव देवगडे, लोकेश दमाहे, आदित्य बोरकर, प्रविण टिकम, सचिन यादव, राजकुमार बावने, शिवा पात्रे, हरीओम प्रकाश नारायण, महेश लोंडे, सुर्याजी दारोडे, आशिष इंचुलकर, आकाश सरोदे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.










