पवित्र स्थळ प्रयागराज येथे पहल्याचं दिवशी , एक कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केले

25

प्रयागराज: पवित्र प्रयागराज शहरात महाकुंभ २०२५ सुरू झाला आहे. आज १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेने महाकुंभाची सुरुवात झाली आहे. पहाटे ५:३० वाजता शुभ मुहूर्तावर शाही स्नानाने कुंभमेळ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम, सर्व आखाड्यांमधील नागा साधूंनी स्नान केले, त्यानंतर सर्व ऋषी-मुनींसह सामान्य जनतेने स्नान करण्यास सुरुवात केली. महाकुंभाच्या पहिल्या दिवशी, स्नानासाठी भाविकांची किंवा लोकांची मोठी गर्दी जमली होती. महाकुंभ परिसरात लोकांची मोठी गर्दी दिसून येते. सकाळपासून आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी स्नान केले आहे.

उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले, “आतापर्यंत, महाकुंभ २०२५ च्या सुरुवातीच्या दिवशी आणि पहिल्या ‘अमृत स्नान’ दिवशी सुमारे १ कोटी भाविकांनी संगम परिसरात पवित्र स्नान केले आहे. संगम येथे भाविकांची गर्दी सुरूच आहे. पोलिस कर्मचारी तिथे उपस्थित आहेत, ड्रोनद्वारेही पाळत ठेवली जात आहे. सुरक्षेसाठी पाण्याखालील ड्रोनचा वापरही करण्यात आला आहे. आतापर्यंत आम्हाला प्रयागराज परिसरात आणि राज्यात कोणत्याही अनुचित घटनेची माहिती मिळालेली नाही. आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सीएमओ कार्यालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.”