कन्हान : – विवेकानंद सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट कन्हान, ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर विदर्भ, शेतकरी- कष्टकरी महासंघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राम नवमी शुभ पर्वावर निलज गावात ” वात्सल्य ” आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या गावाला स्वातंत्र्य मिळाल्या पासुन आता पर्यंत हक्काची आरोग्य सेवा मिळु नये हीच शोकांतिका असल्याने सर्वसामान्यांची सेवा हेच ध्येय व नैतिक जबाबदारी, सामाजिक ऋण, बांधिलकी यातुन संस्थे व्दारे रविवार (दि.६) एप्रिल ला समाज मंदीर निलज गावात संस्था अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत जेष्ट शाहिर विजय चकोले यांचे हस्ते ” वात्सल्य ” निशुल्क आरोग्य सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य तज्ञ डॉ. आंनद गजभिये एमबीबीएस, व्यंकट कारेमोरे माजी जि. प.सदस्य, दिलीप राईकवार, कोठीराम चकोले, सुमित डोंगरे सरपंच, डॉ. दिपक पाहुणे, गुंडेराव चको ले पोलीस पाटील, शिवराम धावडे माजी सरपंच, चेतन कुंभलकर उपसरपंच खंडाळा, शेषराव चकोले अध्यक्ष तंटामुक्ती आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ७५ रूग्णानी निशुल्क आरोग्य तपासुन व औषधीचा लाभ घेतला. ही आरोग्य सेवा दर रविवार ला निलज येथे आरोग्य तज्ञ डॉ. आंनद गजभिये रूग्णाना तपासुन औषधी देऊन सेवा प्रदान करणार आहे. यास्तव पंच कोशितील गावातील रूग्णानी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे रविंद्र चकोले हयानी केले. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता अभिलाष चकोले, नरेश टोहणे, पंकज पाटील, सुभाष देशमुख, डोमाजी चकोले, प्रेम दास शिंदेमेश्राम, आशिष चकोले, सौ. भारती कुंभल कर, पायल चकोले, उर्मिला शेंदुरकर, वृषभ धावडे, प्रदिप चकोले, भैरव धावडे, राहुल सोनबरसे, धनराज चकोले, सचिन साळवी, रूपेश सातपुते, हबीब शेख, राजु गणोरकर, पुरुषोत्तम येणेकर, संतोष गिरी, इंदल यादव, देवराव चकोले, गुंडेराव भुते, रामचंद्र चकोले, रमेश चकोले, क्रिष्णा केजरकर, श्याम चकोले, मनिष भुते, खेमराज चकोले आदीने सहकार्य केले .










