कन्हान : – ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा च्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विवे कानंद नगर कन्हान येथे ग्रामिण लोक कलावंतांचा भव्य मनोमिलन सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

शनिवार (दि.५) एप्रिल ला सकाळी ११ वाजता विवेकानंद नगर कन्हान येथे मा.देशमुख गुरूजी सह मान्यवरांनी महापुरूषा प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्प ण करून लोककलावंताच्या भव्य मनोमिलन सोहळ याचे उद्घाटन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेक लोक सभा क्षेत्राचे माजी. खासदार प्रकाश भाऊ जाधव हयां ना संस्था पदाधिका-यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफ ळ व सन्मान प्रतिमा भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा खरा वारसा जोपसण्याकरिता ग्रामिण लोक कलावंत स्वत:च्या तुटपुंज्या व्यवस्थेतुन येणाऱ्या अडचणीतुन मार्ग काढुन आपल्या कलेतुन भेदभाव, अंधश्रदा, वाईट प्रथा, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या अश्या ज्वलंत सामाजिक समस्या प्रखरपणे सादर करित मनोरंजनातुन मार्मिक समाज प्रबोधन करणा-या ख-या माझ्या ग्रामिण लोक कलावं ताच्या सोबत सदैव उभा राहुन त्याना त्यांचे मौलिक हक्क मिळवुन देण्यास मी सदैव प्रयत्नशिल राहील अशी ग्वाही मा. प्रकाश भाऊ जाधव यानी दिली. व संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबारावजी दुपारे यांनी आप ल्या मार्गदर्शनातुन गेल्या काही वर्षांपासुन लोप पावत चाललेल्या पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशिल राहुन कलाक्षेत्रात होणारा भष्टाचार थांबविल्या शिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले.

तसेच राष्ट्रीय सचिव निशाताई खडसे यांनी समाजातील लोककलावंत महिलांना एकत्रिकरण करून शासनाच्या विविध योजनांची माहितीचा पाठ पुरावा करित त्यांचे अधिकार मिळवुन देण्यास सदैव कार्य करित प्रयत्नशिल राहील अशी ग्वाही दिली. या प्रसंगी संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा पुष्पाताई निंबुलकर, विदर्भ अध्यक्ष विनोद बिसने, विदर्भ उपा ध्यक्ष रमेश सहारे, विदर्भ संघटक शंकर लांबट, जिल्हा अध्यक्ष सुधाकर मुळेकर, उपाध्यक्ष प्रभाकर नागमोते, नरखेड तालुकाध्यक्ष रामाजी धुर्वे, उपाध्यक्ष श्रावण क्षिरसागर, काटोल तालुकाध्यक्ष नेत्राम सोमकुवर, पार शिवनी तालुकाध्यक्ष शिवदास बघमारे, संघटक कृष्णा लांडगे, कळमेश्वर तालुकाध्यक्ष संजय सोमकुवर, उपा ध्यक्ष अनिल चवरे, भुवनेश्वर वाघमारे, महिला नागपुर जिल्हाध्यक्षा सुनिता भोयर, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना काळे, जिल्हा संघटक पुष्पा गावंडे, उपाध्यक्ष माला डाफ, प्रेमिला वानखेडे, मौदा तालुकाध्यक्ष कल्पना बिसने, अध्यक्ष जोगी साखरवाडे, रामटेक तालुकाध्यक्ष रामदास मोहतकर, उपाध्यक्ष विलास सरोदे, ता. संघट क कैलास कारेमोरे, ता. सदस्य वासुदेव उईके, महीला अध्यक्षा सुलोचना नरोले, मौदा ता. उपाध्यक्ष रंजना नगरे, पारशिवनी महिला तालुकाध्यक्ष दुर्गा सोनबरसे, काटोल तालुकाध्यक्ष रोशनी वाहने, नरखेड तालुकाध्य क्षा अरूणा मूळेकर, कन्हान शहराध्यक्ष संजय केने आदीच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विनोद बिसेन यानी सूत्रसंचालन तर पुष्पा गावंडे यांनी सर्व लोक कलावंतांचे आभार मानले. मेळाव्यात नाग पुर जिल्ह्यातील ९३ मंडळांनी सहभाग घेत भजन, कीर्तन, भारुड, खडी गंमत, नाटक, गायन अशा विविध ग्रामिण लोककला सादर करून मनोरंजनात्मक प्रबोध न केले. सर्व लोक कलावंताना शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता विवेकानंद सेवा मंडळ चॅरिेटेबल ट्रस्ट, ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व शेतकरी कष्टकरी महासंघा चे दिलीप राईकवार, राजेश तुमसरे, मोतीराम रहाटे, प्रविण जुमळे, मुकेश तिवारी, मधुकर नागपुरे, गोविंद जुनघरे, सचिन साळवी, इंदल यादव, रूपेश सातपुते, हबीब शेख, राजेश गणोरकर, पुरूषोत्तम येणेकर, जिवन ठवकर, प्रतिक जाधव, संतोष गिरी, मनोज गुरधे, प्रशांत येलकर, शिव जाधव, रविंद्र चकोले, अमर किरपाने, संकल्प भोगे, रोहित संतापे, राकेश चौधरी सह कार्यक र्त्यानी सहकार्य केले.










