राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिनी शिवाभिवादन

27

कन्हान : – स्वामी विवेकानंद सेवा मंडळ चँरिटेबल ट्रस्ट, ग्रामौन्नती प्रतिष्ठाण, शेतकरी कष्टकरी महासंघ जि. नागपुर (महाराष्ट्र) व्दारे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिनी शिवाजी महाराजांना शिवाभिवा दन करण्यात आले.


गुरूवार (दि.३) एप्रिल २०२३ ला दुपारी १.३० वाजता ” शिवरत्न ” लोकोपयोगी कार्यालय स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी मा. ताराचंद निंबाळकर, मधुकर नागपुरे, गणेश खांडेकर, आदीच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण आणि जयघोष करित शिवाभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी पत्रकार मोतीराम रहाटे, माधव काठोके सर, कमलेश पांजरे, प्रदीप वानखेडे, प्रविण गोडे आदी नी शिवाजी महाराजांच्या मौलिक कार्याचा गुणगौरव करून मनोगत व्यकत केले. राजे शिवाजी महाराजांचा (दि.०३ एप्रिल १६८०) ला म्हणजे आजच्या दिवशी आमच्या लाडक्या महाराजाने आम्हास स्वाभिमानाने जगायला शिकवुन या स्वराज्याचा निरोप घेतला. अश्या महान राजास संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी मानाचा त्रिवार मुजरा करून शिवस्मृति दिना निमित्त राजांना विनम्र शिवाभिवादन केले. तदंत र सर्वानी उभे होऊन दोन मिनिट मौनधारण करित महाराजांना विनम्र शिवाभिवादन केले. याप्रसंगी दिली प राईकवार, ज्ञानेश्वर राजुरकर, गोविंद जुनघरे, विजय डोणेकर, सुरेश मानकर, प्रविण गोडे, सचिन साळवी, रूपेश सातपुते, राजेश गणोरकर, पुरूषोत्तम येणेकर, जिवन ठवकर, प्रतिक जाधव, आकाश पंडितकर, हबीब शेख, अकुंश चौरे, राजेश शर्मा, आशिष नागपुरे, संतोष गिरी सह तिन्ही संस्थेचे सदस्य मंडळी प्रामुख्या ने उपस्थित होते.