स्वराज्य रक्षक राजे संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी संभाजी ब्रिगेड व्दारे अभिवादन

18
कन्हान : – छात्रवीर, स्वराज्य रक्षक राजे संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी संभाजी ब्रिगेड कन्हान व्दारे राम नगर कन्हान येथील कार्यालयात राजे संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
         मंगळवार (दि.११) मार्च २०२५ ला स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छात्रवीर, स्वराज्य रक्षक राजे संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी मराठा सेवा संघ कार्यालय राम नगर कन्हान येथे संभाजी ब्रिगेड कन्हान तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करून छत्रपती राजे संभाजी महाराजांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेड कन्हान चे संदीप कुकडे, मराठा सेवा संघ कन्हान जेष्ठ मार्गदर्शक ताराचंद निंबाळकर व जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा माया ताई इंगोले यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्प अर्पण करित अभिवादन करून ” जय जिजाऊ !! जय शिव राय !!  जय शंभु राजे !!  चा जयघोष करित कार्यक्र माची सुरूवात करण्यात आली. यावेळी डॉ. पंजाब राव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते सरांनी स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणार्थ बलाढय मुघलांशी लढा देऊन मराठा राज्याचा विस्तार केला. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी “बुध्दभुषण” ग्रंथ लिहिला . आणि ११ मार्च ला स्वराज्याच्या रक्षणार्थ प्राणाचे बलिदान दिले. अश्या त्यांच्या महान कार्याविषयी मार्ग दर्शन केले. सर्व उपस्थितानी राजे संभाजी महाराजां च्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विन्रम अभिवादन केले. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या लताताई जळते, कमलताई गोतमारे, रंजना इंगोले, मराठा सेवा संघाचे वसंतराव इंगोले, मोतीराम रहाटे, कमलसिह यादव, नामदेव नवघरे, प्रविण सतदेवे, दिवाकर इंगोले, संभा जी ब्रिगेड चे संदीप कुकडे, राकेश घोडमारे, अमोल देऊळकर, आंनद इंगोले, अमोल डेंगे, संजय चंहादे, स्वप्निल अवसरे, दिपक उघडे आदी सह पदाधिकारी, कार्यकर्त्यानी उपस्थित राहुन बलिदान दिनी छत्रपती संभाजी महाराजांना विन्रम अभिवादन करण्यात आले .