नागपूर/काटोल –
विदर्भात वैद्यकीय दंत चिकित्सा क्षेत्रात मानवतेचा परिचय देणारे सुप्रख्यात व्यक्तिमत्व डॉ सय्यद अब्रार यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवता वैद्यकीय सेवेबद्दल बांद्रा मुंबई येथील विशेष कार्यक्रमात सन्मानित केले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थेने दखल घेऊन विविध पुरस्कार देऊन त्यांचे प्रेरणादायी कार्याची दखल घेतली आहे.

डॉ अब्रार मानवता व राष्ट्रप्रेमाचे पुरस्कर्ते
गेल्या 25 वर्षांपासून दंत चिकित्सा क्षेत्रात अवलोकनीय कार्य करीत आहे. महागडे दंत तपासणी करिता केवळ विस रुपया मध्ये उपचार करून अतिशय माफक खर्चात दातांचे उपचार करतात. अति आवश्यक अल्प औषधी व खर्च रुग्णांना सहज परवडणारा असल्याने विदर्भातून दररोज मोठया प्रमाणात रुग्ण सेवा डॉ अब्रार यांचे माध्यमातून रुग्णांना समाधानकारक सेवा लाभत आहे. त्यामुळेच प्रत्येक रुग्ण त्यांचेव संपूर्ण टीमचे सेवेबद्दल खुष आहे. त्यामुळेच त्यांचे सेवेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
————-==—–=
डॉ अब्रार यांना अनेक प्रतिष्ठाचे पुरस्कार….
केवळ पैसे मिळविण्याला प्राधान्य
न-देता आजचे स्पर्धेत्मक परिस्थिती असतांना समाजसेवा व मानवता दृष्टीकोन पुढे ठेऊन त्यांचे सेवकार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. मेळघाट आदिवासी भागात व अमरावती जिल्ह्यात त्यांचे कार्य क्षेत्र व कर्मभूमी ठरली आहे.त्यांचे कार्याची दखल घेऊन चिखलदरा येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघ,हुमन राईट कंन्सिल ऑफ इंडिया यांनी मानवता सेवा पुरस्कार इंडियन पिस अँबेसिडर डॉ आचार्य मुनी मुंबई यांचे हस्ते प्रतिष्ठाचा पुरस्कार,महाराष्ट्र मानव सेवा पुरस्कार,शिवाजी शारीरिक शिक्षण संस्था,युवा स्वाभिमानी संघटना,अल्पसंख्याक मोर्चा, मा.मंत्री महोदय खासदार, आमदार यांनी अनेकदा विविध कार्यक्रमातून यापूर्वी सन्मानित केल्याने त्यांचे सामाजिक कार्याला उजाळा व प्रेरणा मिळत आहे.
——===——–=
रोजामुळे शरीराचे शुद्धीकरण होते.-डॉ अब्रार
पवित्र रमजान मध्ये 13 तास कडक रोजा पाळल्याने किडनी, लिव्हर, ब्रेन आदी शरीरातील टॉक्सीन बाहेर पडत असल्याने इम्युनिटी सिस्टम मध्ये सुधारणा होऊन शारीरिक स्वास्थ सुधाण्यास अनमोल मदत होते. याकरिता पचनक्रिया सुधारण्यास रोजा उपवास मनुष्याला निरोगी आयुष्याकडे नेत असल्याचे मार्गदर्शन प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ सय्यद अब्रार यांनी मुलाखतीतून सांगितले. पुढे ते म्हणाले अक्कल दाढ व अक्कल काहीच संबंध नाही. अक्कल दाढ किंवा दात काढल्याने अक्कल कमी होणे किंवा नजर (दृष्टी)कमी होण्यासंबंधी गैरसमज असून त्रास असल्यास उपचार केल्यास त्रासापासून मुक्ती मिळेल. कोणतीही हानी होत नसल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी दिली.समाजातील गैरसमज दूर होण्याचा त्यांनी सजकतेचा सल्ला दिला.










