कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रा भव्य मिरवणुकीसह प्रस्थान

25

कन्हान : – श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे श्री साई ची छोटीशी सेवा म्हणुन श्रीराम नवमी उत्सवा निमित्य साई मंदीर इंदिरा नगर कन्हान येथुन भव्य मिरवणुकी सह साई पालखी व पदयात्रा शिर्डी करिता हर्षोउल्हासात प्रस्थान करण्यात आली.
तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन ।
साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन ।।
दरवर्षी प्रमाणे १५ व्या वर्षी श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे श्रीराम नवमी उत्सवा निमित्य रविवार दि.१६ मार्च ते रविवार दि.६ एप्रिल २०२५ कन्हान ते शिर्डी पालखी व पदयात्रा रविवार (दि.१६) मार्च ला सकाळी ११ वाजता श्री साई मंदिर इंदिरा नगर तारसा रोड कन्हान येथे पुजा अर्चना करून बँड, डिजे, साई रथ, पालखी साईच्या गर्जेने सह जल्लोहसात साई भक्तांची भव्य मिरवणुक पालखी व पदयात्रा शिर्डी करिता प्रस्थान करण्यात आली. याप्रसंगी अजय ठाकरे, रुपाली ठाकरे, मनोज चिकटे वंदना चिकटे, साई ठाकरे भार्गव ठाकरे यांच्या वतीने साई भक्ताना भोजनदान कर ण्यात आले. साई पालखी मिरवणुकीचे शहिद प्रकाश देशमुख चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन रोड, गांधी चौक येथे भाविक भक्तानी फुलांचा वर्षाव करून पाणी, शरबत, फळ साई भक्ता ना वितरण करून जल्लौहसात स्वागत करण्यात आले. सायंकाळी श्री साईकृपा संस्थान नागार्जुन कालोनी जरीपटका रिंग रोड नागपुर येथे मुक्का म (दि.१७) मार्च ला सकाळी पालखी प्रस्थान करून कळमेश्वर मार्गे पुढे शिर्डी करिता मार्गक्रमण करेल. पालखी दिनचर्या – सकाळी ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ६.३० वा. मंगलस्नान व अभिषेक, दुपारी १२ वा. मध्यान्ह आरती, नैवेद्य, दुपारी ४.३० वा. साई गुरूपाठ अभंग, सायंकाळी ६.४५ वा. धूपआरती, नेवेद्य, रात्री १०.३० वा.शेजारती आणि रविवार (दि.३०) मार्च गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साई सच्चरित्र साप्ताहिक पारायणाचे आयोजन केले आहे.


कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रेच्या यशस्विते करिता आयोजक नरेश बर्वे, मनोज चिकटे, अजय ठाकरेे, महेश काकडे, गणेश हटवार, चेतन अंबागडे, सतिश मूळे, आकाश गिरडकर, प्रमोद काकडे, मिलींद पोपटकर, अविनाश रायपुरे, अनिल विश्वकर्मा, प्रविण माने, अविनाश जोरनकर, पंकज मूळे, साई ठाकरे, पवन माने, चेतन वैद्य, सुमित खैरकर, प्रविण पोपटकर, राजेंद्र शेंदरे, गौरव गिरडकर, अनिल नेवार सह श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान जि. नागपुर चे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच साई भक्त सहकार्य करित आहे.