माजी सरपंच काँग्रेस पदाधिकारी किशोर वानखेडे सह अन्य सदस्यांचा भाजप मध्ये प्रवेश

107

कामठी ता .१३ -कोराडी येथील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्हा सरचिटणीस अजय बोढारे, तालुकाध्यक्ष सुनील कोडे यांच्या नेतृत्वात पिपळा येथील माजी सरपंच काँग्रेस पदाधिकारी किशोर वानखेडे व घोगली येथील राजेंद्र राजूरकर यांच्या नेतृत्वात सतीश उमरे, राहुल शेवाळकर, प्रणित झाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. सर्वांचे पार्टीमध्ये स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या |