कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पिपरी ते गाडेघाट रोड लगत नाल्या जवळील सुफी फार्म हाउस जवळ झाडी झुडपात सुरु असलेल्या जुगार अड्यावर कन्हान पोलीसांनी धाड मारुन सात आरोपी ला ताब्यात घेऊन लाखोंचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे .

प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.२३) फेब्रुवारी ला दुपारी ३ ते ४ वाजता दरम्यान कन्हान पोलीस प्रोव्हिशन व जुगार रेड करिता खाजगी वाहनाने पिपरी ते गाडेघाट परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, रोड लगत नाल्या जवळील सुफी फार्म हाउस जवळ झाडा खाली झुडपात ५२ तास पत्यावर पैशाची बाजी लावुन हार जीत चा जुगार खेळीत आहे. अश्या माहिती वरुन पोलीसांनी लपत छपत सुफी फार्म हाउसचे बाजुने झुडपात एका झाडाखाली अवैद्य जुगार अड्यावर धाड टाकली असता ७ इसम ५२ ताश पत्यावर पैशाची बाजी लावुन हार जीतचा जुगार खेळतांना पकडले. यात १) मोहमद शरीफ मोहमद हनिफ ( ५५ ),२) शाहीद मुमताज अक्तर (३६), ३) शेख फहीम शेख कयुम (४१), ४) मोहमद ईस्माईलअन्सारी ( ४०) , ५) रियाज अहमद सियाज अहमद (४६) , ६) रजब अली मोहमद युनुस (४२), ७) मोहमद जावेद मोहमद कासीम (२८) सर्व राहणार नागपुर यांची पोलीसांनी अंगझडती घेतली असता त्यांचा जवळुन नगदी १४०९० रुपये, सात मोबाइल किंमत ८७,००० रुपये, डावावर नगदी ८५० रुपये, ताश पत्ते किंमत ५० रुपये , बजाज ऑटो क्र. एमएच ४९ बीएम ९४४९ किंमत १,५०,००० रुपये, दुचाकी वाहन राॅयल एनफिल्ड क्र. एमएच ४९ बीक्यु ५१७७ किंमत ७५,००० रुपये आणि मोपेड वर्गमॅन विना नंबरची ग्रिन कलरची किंमत ८०,००० रुपये असा एकुण ४,०६,९९० रुपयांचा मुद्दे माल मिळुन आल्याने घटनास्थळावर जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी हरिष सोनभद्रे यांचा तक्रारीवरून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल कर ण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात पोहवा हरिष सोनभद्रे, अमोल नागरे, अश्विन गजभिये, आकाश सिरसाट, जीवन वीघे, महेश बिसेन, सम्राट वनप्रती सह पोलीस कर्मचा-यांनी ही कारवाई सिताफीतीने यशस्विरित्या पार पाडली.










