संत गाडगे बाबा जयंती मराठा सेवा संघ कन्हान व्दारे उत्साहाने साजरी

15
 
कन्हान : –  संत गाडगे बाबा यांची जयंती मराठा सेवा संघ कन्हान व्दारे राम नगर कन्हान येथील कार्यालया त कार्यक्रमा सह उत्साहाने साजरी करण्यात आली.

         रविवार (दि.२३) फेब्रुवारी २०२५ ला संत गाडगे बाबांची जयंती मराठा सेवा संघ कार्यालय राम नगर कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन करून संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला मराठा सेवा संघ कन्हान जेष्ठ मार्गदर्शक ताराचंद निंबाळकर व नगरसेवक राजेंद्र शेंदरे, जिवन मुंगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपा ध्यक्ष शांताराम जळते सरांनी संत गाडगे बाबांचे दश सुत्री संदेश १) भुकेलेल्यांना= अन्न, २) तहानलेल्यांना = पाणी, ३) उघड्यानागड्यांना = वस्त्र, ४) गरीब मुला, मुलींना शिक्षणासाठी = मदत, ५) बेघरांना = आसरा, ६) अंध, पंगु, रोगीना औषधोपचार, ७) बेकारांना = रोजगार, ८) पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय, ९) गरीब तरुण तरुणींचे = लग्न, १०) दु:खी व निराशांना = हिम्मत,

       गोरगरीबांना शिक्षण हाच खरा रोकडा धर्म आहे ! हिच खरी भक्ती व देवपुजा आहे. असे सांगितले तर

नगरसेवक राजेंद्र शेंदरे हयानी संत गाडगे बाबांंच्या समाज परिवर्तन कार्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसं गी ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे, संदीप कुकडे, राकेश घोडमारे, दिवाकर इंगोले, शिवशंकर (चिंटु) वाकुडकर, अमोल देऊळकर, संजय चंहादे, आंनद इंगोले, योगराज अवसरे, अमोल डेंगे, मायाताई इंगोले, लताताई जळते आदीनी पुष्प अर्पण करून संत गाडगे बाबांना अभिवादन करून जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.