कन्हान पोलीसांनी तपास करित दोन आरोपीना पकडुन वाहन केले जप्त.

19

चारचाकी वाहन चोरीचे आरोपी १२ तासात पोलीसांच्या ताब्यात

कन्हान : – शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील तारसा रोड चौक येथील प्रमोद किराणा दुकान सामोरुन चार चाकी वाहन चोरुन नेणाऱ्या दोन आरोपींना कन्हान पोलीसांनी १२ तासात पकडुन त्यांचा जवळुन चोरी केलेले चारचाकी वाहन जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.
प्राप्त माहितीनुसार अमोल सदाशिव कुंभलकर वय ३० वर्ष रा. बोरी-सिंगोरी हा गावात भागवत सप्ता हाचा दहिकाला कार्यक्रम असल्याने किराणा सामान खरेदी करण्यास गुरुवार (दि.६) फेब्रुवारी ला दुपारी १२ वाजता गावातील इतर लोकांना आपल्या महिन्द्रा कंपनी सुप्रो चारचाकी वाहन क्रमांक एमएच ४० सीडी २७३४ मध्ये घेवुन आला. कन्हान तारसा रोड चौकाती ल प्रमोद किराणा दुकानातुन २०,००० रुपयाचा किरा णा खरेदी करुन वाहनात ठेऊन अमोल १० मीटर अंत रावर देवकृपा वस्त्र भंडार येथे पैसे देण्याकरिता गेला. अमोलच्या नजरचुकीने वाहनात चाबी राहुन गेल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी संधी साधुन वाहन चाबीने सुरु करुन वाहन किंमत २,२५,००० रुपये व त्यातील २०,००० रुपयाचे किराणा सामान असे एकुण २,४५,० ०० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. कन्हान पोलीसांनी अमोल कुंभलकर यांचे तक्रारीवरुन कलम ३०३(२) भा.न्या.संहिता अन्वये गुन्हा दाखल केला. घटना गांभी र्याने घेत पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी डी.बी पथकाला मार्गदर्शन करुन त्वरित तपास सुरू केला. डी.बी पथक पोलीसानी तांत्रिक पुराव्याच्या आधारे आणि गोपनिय बातमीदारा मार्फत रेकॉर्ड वरिल आरो पी १) शुभम राजेश सोमकुंवर वय २४ वर्ष रा. सिहोरा, २) राहुल दिलीप कहार वय २४ वर्ष रा. हरिहर नगर कांद्री यांना ताब्यात घेत सखोल विचारफुस केली अस ता त्यांनी गुन्हा कबुल केल्याने पोलीसांनी त्यांचे जवळु न चोरी केलेली महिन्द्रा कंपनी सुप्रो चारचाकी वाहन जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.
सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोली स निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सपोनि राहुल चव्हाण, हरिष सोनभद्रे, महेश बिसेन, अमोल नागरे, अश्विन गजभिये, आकाश सिरसाट, अनिल गजभिये, जीवन विघे सह पोलीस कर्मचा-यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.