कन्हान : – शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ लगतच्या दुकानदारांना नगर परिषद प्रशासनाने नोटिस देऊन पाच दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आदेश दुकानावर चिपकवुन मुख्याधिकारी हयानी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, पीडब्लुडी , महसुल यांचे सह पोलीस अ़धिका-यांच्या कडक बंदो बस्तात होम पाईप गेट पासुन तर स्टेशन रोड पर्यंत म्ह़णजे महामार्गालगत फक्त पुंजीपतीच्या ले-आऊट समोरिल शंभरा जवळ छोटी, मोठी दुकान कित्येक वर्षापासुन लावुन कुंटुबांचे पालन पोषण करणा-या दुकानदाराचे दुकाने जेसीबी, केन ने तोडुन या दुकानदाराना दुसरी कुठलिही पर्यायी व्यव स्था न करता बेरोजगार करून त्यांचे कुंटुबावर उपासपारीची पा़ळी नगरपरि षदेने आणल्याने दुकानदारात राज्य सरकार, शासना विरूध्द तीव्र संताप व्यकत करित आहे.

नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांनी ३० ते ४० वर्षा पासुन दुकाने लावली आहे. दुकानदार दुकाना च्या भरोश्यावर आपल्या परिवाराचे, मुलांबाळाच्या शिक्षणासह कुटुंबाचे पालनपोषण करून उदर्निवाह करित आहे. ग्राम पंचायत कार्यकाळात दुका नदारांना स्थाई जागा मिळाली नाही. परंतु ग्राम पंचायतचे रुपांतर नगर परिष देत होऊन दहा वर्ष लोटुन गेली. मात्र नगरपरिषद प्रशासनाने दुकानदारांना स्थाई जागा मिळवुन दिलेली नाही. वारंवार सामाजिक संघटनांनी, दुकानदरां नी स्थाई जागा देण्याची मागणी केली. लोक प्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासनाने याची कुठलिच दखल घेतली नाही. परंतु अनेक वर्षापासुन हिंदु स्तान लिव्हर कंपनीची जागा खाली पडली होती. त्याजागेवर रोजगार आणा वा किंवा शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता जागा उपयोगात आणावी अशी मागणी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार केली. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या आणि राजकीय दबावात काम करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा ग्रोमर वेंचर्स ला जाऊ दिली. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकासावर प्रश्न निर्माण झाला आहे. गुजरी व आठवडी बाजाराला आणि फुटपाथ दुकानदारांना स्थाई जागा नाही, बस स्टैंड नाही, खेळाचे मैदान नाही, मोठे शासकिय रूग्णालय नाही, शुद्ध पाण्या ची व्यवस्था नाही आणि मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करण्यास जागेचा प्रश्न असताना नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करून हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा ग्रोमर वेंचर्स ला का विकत घेऊ दिली ?
ग्रोमर वेंचर्स च्या पुजीपती मालकाने प्लॉट पाडुन मोठया प्रमाणात लाभ मिळविण्याकरिता महामार्ग लगत दुकाने अडसर निर्माण करित अस ल्याने पुंजीपती मालकाने राज्याच्या सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर दबाव आणल्याने नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक धोडके यांनी उच्च न्यायालय रिट याचिका क्र.३६५५/२०२० व रिट याचिका ११८७/२०२४ मध्ये पारित आदेश आणि महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. जमीन ०७/२०१३/प्र.क्र. ३७४/ज-१ दि. १०/१०/२०१३ चा संदर्भ देत राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ लागत सार्वजनिक नालीवर केलेले अतिक्रम ५ दिव सात हटविण्याचे नोटिश दुकानावर चिपकविले. शनिवार (दि.४) जानेवारी ला सकाळी ११ वाजता दुकानदारानी कन्हान भाजप नेते डॉ मनोहर पाठक यांच्या नेतुत्वात मुख्याधिकारी, पीडब्लुडी सह उपस्थित अधिका-याना कमीत कमी ५ दिवसाची वेळ द्या आम्ही स्वत: आपली दुकाने हटवितो जेणे करून आम्हच्या साहित्याचे व मालाचे नुकसान होणार नाही. अशी विनंती करून सुध्दा आम्हाला वरिष्ठाचा आदेश, दबाव असल्याने काहीही करू शकत नाही म्हणुन मुख्याधिकारी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व पी डब्लु डी चे अधिकारी, महसुल अधिकारी आ़णि डिवायएसपी संतोष गायकवाड, कन्हान पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील याच्या कडक पोलीस बंदोबस्तात होम पाईप गेट पासुन तर स्टेशन रोड पर्यंत म्ह़णजे महामार्गालगत फक्त पुंजीपतीच्या ले-आऊट समोरिल शंभरा जवळ कुंटुबाच्या उदनिर्वाह करिता छोटी, मोठी दुकान कित्येक वर्षापासुन लावुन कुंटुबांचे पालन पोषण करणा-या दुकानदा राचे दुकाने जेसीबी, केन ने तोडुन या दुकानदाराना दुसरी कुठलिही पर्यायी व्यवस्था न करता बेरोजगार करून त्यांचेवर उपासपारीची पा़ळी नगरपरिषदे ने आणल्याने हे सरकार व शासन नागरिकांचे की पुंजीपती मालकांचे ? असे म्हणत दुकानदारानी टाहो फोडुन रडत तिव्र संताप व्यकत करित होते.










