कन्हान : – जय बजरंग व्यायाम शाळा केरडी आणि ग्रामस्था व्दारे मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर आयो जित कुस्त्यांचा आमदंगल व सायंकाळी लोक मनोरंज नाचा कार्यक्रम केरडी येथे यशस्विरित्या पार पाडण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे मकर संक्रांतीच्या पावन सणाच्या पर्वावर मंगळवार (दि.१४) जानेवारी २०२५ ला जय बजरंग व्यायाम शाळा केरडी आणि ग्रामस्था व्दारे आयोजित कुस्त्यांचा आमदंगलचे उद्घाटन माजी मंत्री सुनिल बाबु केदार यांच्या हस्ते करून कुस्त्याला सुरू वात करण्यात आली. सर्व प्रथम छोटया पहेलवानांच्या कुस्ती सामने घेण्यात आले. तदंतर आमदंगल मध्ये नागपुर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आदी जिल्हया तील आणि मध्य प्रदेश येथील मोठया १२० पहेलवानां नी सहभाग घेतला असुन यात विशाल पहेलवान नाग पुर विरूध्द राजेश पहेलवान सिवनी मध्य प्रदेश आणि समीर पहेलवान केरडी विरुध्द महेश पहेलवान कुंभारी यांच्या रोमहर्षक कुस्ती सामान्याने दर्शक मंत्रमुग्ध झाले होते. कुस्तीचा आमदंगल जय बजरंग व्यायाम शाळा केरडीचे अध्यक्ष मा. दयाराम भोयर यांचे अध्य क्षेत आणि रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते विजयी पहेलवानाला भेट वस्तु व नगदी रूपयाचे बक्षिष वितरण करण्यात आले. सायंकाळी लोक मनोरंजनाचा कार्यक्रम धुमाल पार्टी नागपुर या संचाने सादर करून ग्रामस्थाचे मनोरंजन केले. कुस्त्या चे पंच म्हणुन देवाजी भोयर, सेवक गडे, अजय राऊत, रामभाऊ हिवसे हयानी उत्तमरित्या कामगिरी बजाव ली. आमदंगल कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गौरव भोयर, पुरुषोत्तम हिवसे, सचिन फलके, प्रकाश ठाकरे, प्रविण शेलारे, पिंटु नितनवरे, पाडुरंग काठोके, राजेंद्र वानखेडे सह केरडी ग्रामस्थानी सहकार्य केले. कुस्ती च्या आमदंगल कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व पाहु णे मंडळीचे आभार कैलास खंडार हयानी व्यकत केले .










