राष्ट्रीय कुराश (कुस्ती) स्पर्धेत आयुषी ठाकरे ला रौप्य पदक

50
कन्हान : –  स्कूल गेम फेडरेशन ऑफ़ इंडिया रायपुर (छत्तीसगढ़) च्या व्दारे आयोजित राष्ट्रीय शालेय कुराश (कुस्ती) स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान ची विद्यार्थींनी कु. आयुषी ठाकरे हिने रौप्य पदक पटक विल्याने कन्हान शहरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
           रायपुर (छत्तीसगड) येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सौजन्याने नुकत्याच झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये बिहा रीलाल खंडेलवाल पब्लिक स्कुल  कन्हानची विद्यार्थि नी कु. आयुषी अजय ठाकरे हिने कुराश (कुस्ती) स्पर्धे त १४ वर्ष वयोगट ४८ किलो वजन गटात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार च्या प्रतिस्पर्धकांना पराभुत केले. परंतु दिल्ली च्या खेडाळुशी अंतिम सामन्यात पराभुत झाल्याने तिने रौप्य पदक प्राप्त केले आहे. राष्ट्रीय कुराश (कुस्ती) स्पर्धेत बीकेसीपी शाळेचे शारीरिक शिक्षक श्री अमित राजेंद्र ठाकुर सर यांचे मार्गदर्शनात कु. आयुषी अजय ठाकरे हिने रौप्य पदक पटकावित  आई, वडिलांचे, शाळा, कन्हान शहर, आणि नागपुर जिल्याचे नाव लौकिक केल्याने शाळेचे अध्यक्ष श्री राजीव खंडेलवाल सर, सचिव पुष्पा गैरोला, मुख्याध्या पिका कविता नाथ, जेष्ट शिक्षक विनयकुमार वैद्य सर, सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदासह कन्हान शहरवासी यांनी खेळाडुं कु. आयुषी अजय ठाकरे चे जल्लोहसात स्वागत करून अभिनंद नाचा वर्षाव करित तिला पुढील यशस्विते करिता शुभेच्छा दिल्या आहे.