पोलीसानी ३२ गौवंश ला दिले जिवनदान,२६,५१,००० रू. चा मुद्देमाल जप्त.

31

कन्हान :- नागपुर जबलपुर महामार्ग मनसर – कन्हान मार्गे बारा चाकी ट्रक मध्ये अवैद्य जनावरे कोंबुन कत्त ली करिता नेताना नागपुर बॉयपास चारपदरी महामा र्गावरील कुंभलकर ढाब्या सामोर स्थागुशा पथक पोलीसानी सिताफितीने सापाळा रचुन पकडुन ३२ गौवंश जनावराना दिले जिवनदान.


मंगळवार (दि.१७) डिसेंबर २०२४ रोजी १० वाजता सुमारास एका पांढऱ्या लाल ट्रक मध्ये अवैद्य जनावरे कोंबुन कत्तलिकरिता मनसर – कन्हान मार्गे येणार आहे अशा माहितीवरून नागपुर बॉयपास चार पदरी महामार्गावर कुंभलकर ढाबा कन्हान येथे स्थागु शा पथकातील अधिकारी व अंमलदार यांचेसह नाका बंदी केली असता ट्रक क्र. एमपी १९ एचएच ११६० या ट्रकला थांबुन सदर ट्रकची पंचासमक्ष झडती घेत ली असता त्यामध्ये दोरीने क्रूरतेने बांधुन भरलेले १) पांढऱ्या, लाल, काळ्या, कोशा रंगाचे ३२ गौवंश असे एकुण ३२ गौवंश किंमत ६,४०,००० रू.आणि २) बारा चक्का ट्रक क्र एमपी १९ एचएच ११६० अंदाजे किंमत २०,००,००० रू. ३)दोन मोबाईल किमत ११,००० रु असा एकुण २६,५१,००० रू. चा मुद्देमाल जप्त केला. पीडित जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन गौशाळा खरबी भडारा येथे दाखल करण्यात आलेले असुन पो.स्टे.कन्हान येथे कलम ११(१)(अ),(ड),(फ) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधि.१९६०, आर /डब्लु ५(१),(२),९, महाराष्ट्र प्राणी सरक्षण अधि. आर/डब्लु ३(१)/१८१ मो.वा.का. सहकलम ४९,३(५) बीएनएस अन्वये आरोपी १) मोहमद हुशेंन शमीम कुरेशी वय २४ वर्ष, २) प्रकाश रामचरण करोशिया वय ४४ वर्ष दोन्ही राह. दमहो मप्र, पाहिजे असलेले आरो पी ३) गौवंश मालक संतु राह. इमलिया दमहो मप्र, ४) फेजुल राह. नागपुर, ५) नादिर राह. मनसर यांचे विरु ध्द गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमाल आरोपी क्र १व २ यांना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही स्थागुशा पथक पो.नि. ओम प्रकाश कोकाटे साहेब यांचे मार्गदर्शनात सपोनि किशोर शेरकी, स.फो.विनोद काळे, पोहवा प्रमोद भोयर, पो हवा किशोर वानखेडे, पोना संजय बरोदीया आदीने यशस्विते रित्या पार पाडली.