कामठी-ऐकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन देत असतांना शेतकऱ्यांना लागणारे सोई सुवेधेकडे त्यात २४ तास वीज पुरवठा अशे असतांना शेतकऱ्यांना सर्वाधिक पिकांकरीता लागत असनारे पाणी मात्र संध्या कामठी तालुक्यात पोलीस विभाग तसेच विदुत विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे हीराऊन गेले असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहे. रंबी पिक चना, गहू, तसेच पालेभाज्या, यांना अंत्यत आवश्यक पाणी लागत असतांना मागील १० दीवसा पासन आजनी,गादा, गावातील शेतशीवारातील ट्रांसफार्मर मधले ऑइल चोरीला गेले असताना विदुत विभागाकडून पोलीसात तक्रार देण्यात आली तरीसुद्धा पोलीस विभागाचे दुर्लक्ष असल्याने रोडच्या चोरट्यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.तर विदुत विभागला शेतकऱ्यांन कडून अनेकदा पिकांना पाणी हव असल्याने परी ट्रान्सफर दुरुस्त करण्याचे विनंती केली असतानाही विद्युत विभागाचे अधिकारी यावर लक्ष देत नसल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे.अशे असतांना विदुत विभागच्या अनेक ठिकाणी सुरु असलेल्या विदुत वाहीण्याचे डी.पी. पॉईंट देखील उघड्यावर असतांना मोठी घटना नाकारता येत नसुन या सर्व बाबी लक्षात घेता विदुत विभागाचे कुठवर लक्ष आहे हे दीसुन येत असल्याचा आरोप या वेळी करण्यात येत आहे. तर लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर चे काम दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशी आज आता शेतकरी धरून बसले आहे।










