नागपूर – राज्यात दीड वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालयात बनावट औषधी रुग्णांना दिली गेली.अद्याप त्यासंबंधित कोणतेही मंत्री, अधिकारी यावर कारवाई नाही. त्याविरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बनावट बहुमत बनावट औषध, नकली सरकार नकली औषध अशा घोषणाबाजी करत आंदोलन केले.










