“नागपूर – बजेट मध्ये वाटा आणि वाट्याकरिता कायदा” बनविण्यासाठी 18 डिसेंबर ला विधानसभेवर भव्य मोर्चा. महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती, जमाती च्या विकासासाठी अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) व आदिवासी सबप्लान (TSP) कायदा पास करावा. असा कायदा 2013 ला तेलंगणा राज्याने बजेट कायदा पारित करून एस. सी, एसटी समाजाच्या विकासासाठी दारे उघडी आहे. महाराष्ट्र सरकारने 2024-25 च्या बजेट मध्ये नियमानुसार अनु. जाती- जमाती ला 70 हजार कोटी रुपयांचा वाटा द्यायला होता. परंतु अर्थसंकल्पात फक्त 8 ते 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. या तुटपुंज्या रकमेतून
आस्थापना व भांडवली खर्च 50 टक्के रक्कम वळविली जाते. उरलेली रक्कम बौद्ध व अनुसूचित जातीच्या विकास योजनांवर खर्च न करता इतर विभागातील योजनांकडे वळविला जाते. 1973 साली महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीकरिता समाज कल्याण विभागाने 21 जून 1979 रोजी युटीए 1079/का-19 क्रमांकाचा शासन जारी केला. या शासन निर्णयानुसार राज्याच्या अर्थसंकल्पातून 15 टक्के निधी हा अनुसूचित जातीच्या योजनांच्या उन्नतीच्या योजनाकरिता निश्चितपणे राखून ठेवण्याचा व त्याकरिता कायदा करण्याची शिफारस मान्य करण्यात आली होती. अत्यंत खेदाने म्हणावे लागते की महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मान्य केलेल्या पागे समितीच्या शिफारशीची सुद्धा अंमलबजावणी केली नाही. दि. 20 डिसेंबर 2017 रोजी आमदार अँड. गौतम चाबुकस्वार यांनी 40 आमदारांच्या सही चे निवेदन तत्कालीन व वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. तेलंगणा राज्याच्या धतीर्वर प्लानिंग,अलोकेशन आणि युटिलाईजेशन ऑफ फायनान्सशियल रिसोर्सस अँक्ट पारित करण्यात यावा अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केले. या अन्यायाविरुद्ध नागपूरातील पक्ष, संघटनांनी अनुसूचित जाती -जमातीचा “बजेट मध्ये वाटा व वाट्याकरिता कायदा” संयुक्त संघर्ष समिती तर्फे बुधवार 18 डिसेंबर ला दुपारी 12 वाजता यशवंत स्टेडियम ते विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आयोजन समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी सेक्युलर, भीम पैथर, आजाद समाज पार्टी, उद्घघोष मैत्री संघ, बहुजन समाज पार्टी, समुहघोष संस्था, भीम आर्मी, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्र, उपासक,उपासिका सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे मागदर्शन प्रदीप गायकवाड, संजय फुलझेले, दिनेश अंडरसहारे, मनोज बनसोड, सुरेश पाटील, उमेश बोरकर, जयंत साठे, योगेश लांजेवार,प्रा. किशोर बिरला, उमेश गजभिये व इतर सभासद करणार आहेत.










