आमदार सुधीर मुनगंटीवार यांची महिलांना मोठी दिलासा देणारी घोषणा. मुल शहरात लवकरच उभे होणार  ‘कल्याण मंडपम्’ !

23
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची महिलांना मोठी दिलासा देणारी घोषणा.
मुल शहरात लवकरच उभे होणार  ‘कल्याण मंडपम्’ !
मूल(प्रती )
“एकदा एक महिला माझ्या कार्यालयात आली होती. मुलीच्या लग्नासाठी १५ हजार रुपयांची मदत मागत होती. मी मदत केली आणि विचारले—एवढ्याशा रकमेने तू लग्नासाठी काय करणार? ती म्हणाली—मंगल कार्यालयाचे भाडे देणार.” या अनुभवाचा उल्लेख करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहरातील महिलांना थेट दिलासा देणारी ऐतिहासिक घोषणा केली.
*“मूलच्या महिलांना आता मंगल कार्यालयासाठी कुणाकडे पैसे मागण्याची गरज नाही. तुम्ही प्रा.किरणताई कापगते यांना विजयी करा; मूल शहरात फक्त ५०० रुपयांत भाड्याने उपलब्ध होईल असे भव्य ‘कल्याण मंडपम्’ २ एकर जागेत उभारून देऊ,”* असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
महिलांचा जबरदस्त प्रतिसाद
३० नोव्हेंबर रोजी मूल शहरातील विविध प्रभागांमध्ये मुनगंटीवार यांच्या पाच प्रचारसभा पार पडल्या. सर्व सभांमध्ये विशेषतः महिला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या या उत्साहाने प्रेरित होऊनच त्यांनी ‘कल्याण मंडपम्’ची घोषणा करताच, टाळ्यांचा कडकडाट आणि हात उंचावून महिलांनी जोरदार स्वागत केले.
“बोलतो ते करून दाखवतो” – मुनगंटीवार
सभेत बोलताना मुनगंटीवार म्हणाले:
राज्याची तिजोरी मी हाताळली आहे. कोणत्या पासवर्डने कुठून निधी आणायचा, याचे ज्ञान मला आहे.”
“जनतेच्या प्रश्नांसाठी कोणताही आडपडदा न ठेवता विधानसभेत स्पष्ट बोलतो. त्यामुळे माझ्याकडून विकासाची गॅरंटी घ्या.”
मूल नगरपरिषद सध्या ५ कोटी १७ लाख १४ हजार ४२५ रुपयांनी तोट्यात असल्याचे सांगत त्यांनी इशारा दिला की, “विरोधक चुकीनेही निवडून आले तर मालमत्ता कर दुप्पट-तिप्पट करतील.”*मात्र, निधी खेचून आणण्याची क्षमता माझ्याकडे असल्याने आजवर हा तोट्याचा भार नागरिकांवर पडू दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“पुन्हा कमळाला साथ दिली तर भविष्यातही मालमत्ता कर वाढू देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.
या सभांमध्ये भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. किरण कापगते, भाजपाचे पदाधिकारी, सर्व प्रभागातील उमेदवार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.