क्षेत्राला “फुटकी कवडी” ही न देणाऱे प्रश्न विचारतात,पण सुधीरभाऊंचा विकास जनतेसमोर!
मुल(प्रती)
नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भाजपने नगरसेवक पदासाठी प्रा सौ किरण कापगते यांना मैदानात उतरवले असून, संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे.या निवडणुकीत विरोधकांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता ते खोटे आरोप,अफवा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत.पूर्णतः निराधार, बिनबुडाचा आणि राजकीय अपयश झाकण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.
क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहरात गेल्या अनेक वर्षांत रस्ते,पाणीपुरवठा,गटार योजना, वीज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, घरकुल,सामाजिक व शेतकऱ्यांसाठी राबवलेली योजना यामध्ये जे ठोस परिवर्तन घडवून आणले,ते आज प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष अनुभवत आहे.घोषणांवर नव्हे,तर प्रत्यक्ष कामावर भाजपचा विश्वास आहे आणि तोच फरक आज जनतेला दिसून येतो.

*विरोधकांचे खासदार* आणि *आमदार* यांनी आपल्या कार्यकाळात मुल शहरासाठी नेमका *किती निधी आणला?*, *कोणती मोठी विकासकामे केली?*, याचा जाहीर हिशोब आधी द्यावा.कारण आज जनतेमध्ये एक ठळक चर्चा सुरू आहे की, त्यांच्या स्वतःच्या आमदार आणि खासदारांनी आजपर्यंत या भागासाठी *‘फुटकी कवडीसुद्धा’* दिलेली नाही.
“फक्त पद मिळवण्यासाठीच आमदार आणि खासदार बनले आहे का?” हा थेट सवाल आज सामान्य नागरिक विचारत आहेत.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामुळे आज मुल शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळत आहे,नव्याने रस्ते तयार झाले आहेत,शहर अधिक प्रकाशमान झाले आहे,स्वच्छता आणि आरोग्य सुविधा मिळत आहेत,शासनाच्या सर्व योजनांचा थेट लाभ लोकांपर्यंत पोहोचत आहे.हे सर्व सुधीरभाऊंच्या *सक्षम नियोजनाचे* आणि *सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे* परिणाम आहेत.विरोधकांकडे आज कामाचा अजेंडा नाही, म्हणूनच ते केवळ भावनात्मक मुद्दे, खोटे आरोप आणि भीतीचे राजकारण करत आहेत.पण मुलची जनता आता हे राजकारण ओळखू लागली आहे.
#भाजप घोषणांवर नाही, कामावर जगते,
#भाजप निवडणुकीपुरते नव्हे, कायम लोकांसाठी असते,
#भाजप सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देते.
मुल शहराची जनता सुज्ञ, जागरूक आणि विकासप्रिय आहे.कोण फक्त आरोप करतोय आणि कोण प्रत्यक्ष काम करतोय, हे मतदार चांगल्याप्रकारे ओळखतात.म्हणून या निवडणुकीत जनतेचा कौल पुन्हा एकदा विकासाच्या बाजूने, स्थैर्याच्या बाजूने आणि भाजपच्या बाजूनेच लागणार, हे निश्चित आहे.










