Home राजकीय स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच सावत्र वागणूक, मग जनतेला सन्मान कुठून मिळणार?

स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच सावत्र वागणूक, मग जनतेला सन्मान कुठून मिळणार?

17
jahir sbha
स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच सावत्र वागणूक, मग जनतेला सन्मान कुठून मिळणार?
मुल(प्रती )
निवडणुकी येतात आणि जातात परंतु माणुसकी सदैव राहिली पाहिजे. जनतेकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने विरोधक प्रचंड संतापात असून, त्या निराशेतून ते आता स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही बळी पाडत आहेत. सत्ता हातातून जात असल्याची भीती त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत आहे.विरोधकांनी पुन्हा एकदा सच्चा कार्यकर्त्याचा अपमान केला.अपप्रचार आणि दिशाभूल करुन,बातम्यांच्या माध्यमातून जनतेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सत्य हे नेहमीच सत्यच असते आणि ते कितीही झाकलं तरी समोर येतंच.
bjp
ज्यांना आज कार्यकर्त्यांचा निष्ठेची आणि प्रामाणिकतेची कींमत नाही,ते जनतेची काय ईज्जत ठेवणार. आजही त्यांच्या पक्षातील असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते दुर्लक्षित, अपमानित आणि निराश आहेत.विरोधी पक्षातून दुःखी होऊन जो कोणी पक्ष सोडतो, त्याला विरोधक पुन्हा कधी आपलंसं मानत नाहीत.आज त्यांची अवस्था केवळ वापरून फेकून देण्यासारखी बनली आहे.कार्यकर्त्यांची स्थिती त्यांच्या पक्षात दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे.
आज जे आरोप केले जात आहेत, त्यामागे राजकीय सूडबुद्धी असून जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्याचा केवळ प्रयत्न सुरू आहे. जे लोक स्वतःच्या पक्षातील लोकांना न्याय देऊ शकत नाहीत, ते जनतेला न्याय देतील अशी अपेक्षा तरी कशी ठेवायची?आज जनतेला सर्व काही दिसतंय.कोण खरे आहे, कोण ढोंगी आहे, कोण विकासासाठी आहे आणि कोण फक्त आरोपांसाठी,हे जनता लवकरच मतपेटीतून दाखवून देणार आहे.
error: Content is protected !!