किरण उदयास आले की, “शांत-ता” आपोआप संपते!

25

किरण उदयास आले की, “शांत-ता” आपोआप संपते!

मूल (प्रती )
नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भाजपने नगरसेवक पदासाठी किरण कापगते यांना मैदानात उतरवले असून, संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या प्रचारामागे या वेळीही सुधीर मुनगंटीवार यांचा मजबूत प्रभाव आणि दीर्घकालीन राजकीय अनुभव स्पष्टपणे दिसून येत आहे.
या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मुनगंटीवार यांचे *“राजकीय जादू”* प्रभावी ठरत असल्याची चर्चा आहे. यंदाच्या निवडणुकीतही विरोधकांचे *“सुपडा साफ”* होण्याचे संकेत राजकीय वर्तुळात बोलले जात आहेत. वरवर जनसमर्थन असल्याचा दावा करणारा विरोधी पक्ष आतून मात्र कमकुवत झाल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधकांचे काही प्रमुख नेते या निवडणुकीपासून आधीच नदराद झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीनंतर उरले-सुरले छोटे कार्यकर्तेही गायब होतील, अशीही राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
जर,विपक्ष तर्फे आज परिस्थितीचे भान न राहिल्यास उद्या ना *सत्ता उरेल*, ना *पद उरेल*, शिल्लक राहील तो फक्त *सदमा, सदमा आणि सदमा*! असे बोलले जात आहे.”
भाजपच्या रणनीतीची खरी झलक निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण शहराला पाहायला मिळणार, अशी खात्री भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.