मूलच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या १ नगराध्यक्ष व २० नगरसेवकांना निवडून देणे गरजेचे.

44

मूलच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या १ नगराध्यक्ष व २० नगरसेवकांना निवडून देणे गरजेचे.

मूलच्या सभेत आमदार  सुधीर मुनगंटीवार यांचे भावनिक आवाहन.

मुल (प्रती )

स्मार्ट  शहर  मुल नगरपरिषद क्षेत्रात सुरू असलेले विकास कार्य निरंतर सुरु ठेऊन आपली उन्नती करायचे असेल तर  येत्या निवडणुकीत भाजपच्या १ नगराध्यक्ष व २० नगरसेवकांना भरघोस मतांनी निवडून देणे गरजेचे आहे, असे  आवाहन  भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूलच्या मतदारांना केले.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची  सुरुवात करताना मुल येथील  रामलीला भवन  मैदानावर सभा घेण्यात आली.  येत्या पाच वर्षांत भाजपचे वतीने करावयाच्या कामकाजाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना माजी मंत्री तथा लोकप्रिय आमदार  सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

राम लीला भवनातील सभामंडपातील  रंगमंचावर भाजपचे उमेदवार, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. उपस्थितांमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,डॉ.मंगेश गुलवाडे, राम लखिया, संध्याताई गुरनुले, प्रभाकर भोयर , रत्नमाला भोयर ,प्रा.किरण  कापगते , वंदना आगरकाटे, चंदू मारगोनवार ,प्रविण मोहुर्ले  व अन्य भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

कांग्रेस पक्षाचा  समाचार घेताना त्यांनी कांग्रेस कडे   स्वतःचा उमेदवार सुद्धा नाही. त्यांना तोही आमच्या जवळूनच पार्सल  घ्यावा लागतो. आम्ही केलेल्या कामातील त्रुटी दाखवून  ओरड केली जाते आहे ‌. त्यांचे जवळ  काय करायचं आहे आणि काय नाही हि सुद्धा  दृष्टी नाही. काहीतरी कारण दाखवून  आरोप करण्यात करण्यात कांग्रेस ला धन्यता  वाटत आहे.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. नगरपरिषदेतही आमचेच सरकार आले तर हा विकासाचा झंझावात कुणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला भाजपच्या उमेदवारांच्या पाठिशी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे  व आपला आशीर्वाद मला दिलात तसाच या सर्व २१ उमेदवारांना द्याल अशी अपेक्षा सभेत व्यक्त केली.