कामठी प्रतिनिधि 23 जुले –कामठी आणि नवी कामठी ला जोड़णाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिज वर महाकाय गर्डर ठेवण्या चे काम मागील महिन्यात दोन तासांचा रेल्वे ब्लॉक घेतल्या नंतर पुर्ण झाले, गर्डर ठेवल्या नंतर लगेच रेल्वे क्रॉसिंग वरिल फाटक रेल्वे प्रशासनाने तात्काळ प्रभावाने बंद केले होते.

त्यामुळे कामठी नवी कामठी भागातील नागरिकांना दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता याची दखल घेऊन स्थानिक माजी नगरसेवक लालसिंग यादव, संध्या रायबोले, प्रतिक पडोळे यांनी महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन रेल्वे क्रॉसिंग गेट खुले करण्यासाठी निवेदन दिले होते. ना बावनकुळे यांनी निवेदनाची तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या दालनात रेल्वे आणि सा.बां.वि. च्या अधिकाऱ्याचीं संयुक्त बैठक घेऊन आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते .

त्या नुसार आज रेल्वे विभागा चे वरिष्ठ अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प) चे अधीक्षक अभियंता पराग ठमके,उप अभियंता महेश पाचकवड़े यांनी माजी नगरसेवक लालसिंग यादव, सौ संध्या रायबोले, प्रतिक पडोळे,भाजपा पदाधिकारी राजेश खंडेलवाल, रजत यादव, विक्की बोंबले, शंकर चवरे,उमेश जगणे,अरविंद चवडे देवानंद कांबळे,भारत सोनी यांच्या सह एकुण परिस्थिति चा आढ़ावा घेतला व आठ दिवसात रेल्वे क्रॉसिंग गेट वाहतुकी साठी खुला करण्याचे आश्वासन दिले.

बॉक्स —
कामठी कडे जाणारा जयस्तम्भ चौक पर्यंत सर्विस रोड, नवी कामठी भागातील घोरपड टी पॉइंट सर्विस रोड, रविदास नगर सर्विस रोड,रामगढ़ सर्विस रोड आणि हनुमान मंदिर सर्विस रोड तसेच सर्व स्ट्रीट लाईट, ड्रेन व इतर आवश्यक कामे करण्या बाबत दोन्ही यंत्रणात एकमत झाले.स्थानिक नागरिकांनी याबद्द्ल महसूल मंत्री व पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.










